Home Crime News Rape Case: शेजारच्या अल्पवयीन मुलीस धमकावून बलात्कार

Rape Case: शेजारच्या अल्पवयीन मुलीस धमकावून बलात्कार

Neighboring minor girl threatened and rape

पुणे | Pune Crime: नऱ्हे परिसरात राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणाने मुलीस तुझ्या कुटुंबीयास ठार मारेन अशी धमकी देत तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी रामेश्वर हरीश्चंद्र हंगरगे वय ३० या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुलगी नऱ्हे परिसरात कुटुंबांसोबत राहते. ती नववीत शिकत आहे. मुलीचे आई वडील कामानिमित्त घराबाहेर गेले की, आरोपी काहीतरी कारण काढून मुलीच्या घरी जबरदस्तीने येऊ लागला. आणि जबरदस्तीने तिच्यावर शारीरिक संबंध प्रस्थपित केले. सप्टेंबर २०२१ पासून त्याने अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.

Web Title: Neighboring minor girl threatened and rape

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here