Home भारत NeoCoV : कोरोनाचा पुन्हा नवा व्हेरिएंट ?

NeoCoV : कोरोनाचा पुन्हा नवा व्हेरिएंट ?

SARS-CoV-2

दिल्ली : चीनमध्ये सापडलेला SARS-CoV-2 ही मागील दोन वर्षांपासून संपूर्ण जगासाठी समस्या बनली आहे. कोरोनानंतर आलेल्या व्हेरिएंट्सने लोकांचं टेन्शन आणखीनच वाढवलं. तर आता दक्षिण आफ्रिकेत NeoCoV या नव्या कोरोनाने पुन्हा एकदा संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून NeoCoV हा विषय खूप चर्चेत आलेला आहे.

NeoCoV या आठवड्यात बराच चर्चेत आहे. गुगलच्या म्हणण्यानुसार, शुक्रवार 28 जानेवारीपर्यंत, भारतात हा 5 लाखांच्या सर्चसोबत टॉपवर आहे. या नव्या शब्दाने अचानक लोकांची चिंता वाढवली आहे. मात्र असे असले तरी NeoCoV हा कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार नाही.

NeoCoV हा शब्द MERS-CoV शी संबंधित असलेल्या व्हायरसच्या व्हेरिएंटसाठी वापरला जातो. 2010 च्या दशकामध्ये MERS-CoV सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि दक्षिण कोरियामध्ये मोठ्या संकटाचं कारण बनला होता. WHO नुसार, MERS-CoV संसर्गाने प्रभावित झालेल्या सुमारे 35 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. NeoCoV हा या विशिष्ट कोरोना व्हायरसचा संभाव्य प्रकार आहे.

Web Title : NeoCoV : A new variant of the Corona ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here