Home नाशिक नाशिक: भाच्याने मामाला संपवले, मृतदेह दिवसभर घरातच होता

नाशिक: भाच्याने मामाला संपवले, मृतदेह दिवसभर घरातच होता

Nashik Crime: रागाच्या भरात भाच्याने मामाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Nephew killed the uncle, the body was in the house all day

नाशिक: मुलाला रुग्णालयात नेहण्यासाठी पैसे नाहीत, अन् दारु प्यायला पैसे आहेत’ असे मामाने भाच्याला सुनावालं होतं. त्या रागाच्या भरात भाच्याने मामाची हत्या (Murder)केली.  पंचवटी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

बाबुलाल सोमा गावित असे मृत्यू झालेल्या मामाचे नाव आहे. मच्छिंद्र माणभाव असे हत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे.

भाच्याने मामाचा खून केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या पंचवटी परिसरात घडली आहे. बाबुलाल सोमा गावित हे गेल्या दोन महिन्यांपासून पंचवटीतील हिरावाडी परिसरात आपला भाचा मच्छिंद्रर माणभाव याच्याकडे राहत होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ‘तुझ्या मुलाच्या पायाला चटके लागले आहेत, त्याला दवाखान्यात दाखवायला तुझ्याकडे पैसे नाहीत. पण दारू प्यायला पैसे आहेत’ असे मामा बोलल्याचा राग मच्छिंद्र  याला आला. रागाच्या भरात मच्छिंद्र याने घरातील पलंगावर बसलेल्या आपल्या मामाला खाली जमिनीवर आपटले. तसेच प्लास्टिकची झाडाची कुंडी मामाच्या छातीत मारुन फेकली. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने मामाचा काही वेळातच मृत्यू झाला.

धक्कादायक बाब म्हणजे, मच्छिंद्र याने मामाला संपवल्यानंतर मृतदेह शुक्रवारी दिवसभर घरातच ठेवला होता. पोलीसांकडे तक्रार देण्यासही कोणी पुढे येत नव्हते. अखेर शनिवारी पोलिसांनी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आणि रविवारी शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर नाशिकमधील पंचवटी पोलिसांनी भाचा मच्छिंद्र माणभावविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस कसून चौकशी करीत आहे.  

Web Title: Nephew killed the uncle, the body was in the house all day

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here