Home Akole News अकोले घटना: चुलत्याचा फावड्याने मारून पुतण्याने केला खून

अकोले घटना: चुलत्याचा फावड्याने मारून पुतण्याने केला खून

Akole News: अकोले तालुक्यातील केळी कोतूळ येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलत्याचा फावड्याने मारून पुतण्याने केला खून (Murder) केल्याची घटना घडली आहे. बाप लेकाना अटक करण्यात आली आहे.

Nephew Murder cousin by beating him with a shovel  

कोतूळ : अकोले तालुक्यातील केळी कोतूळ येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलत्याचा फावड्याने मारून पुतण्याने केला खून केल्याची घटना घडली आहे. बाप लेकाना अटक करण्यात आली आहे.  पडीक शेतात जाणाऱ्या जनावरांना का अडवले असा जाब विचारायला गेलेल्या चुलत्याचा फावड्याने मारून पुतण्याने खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी बाप-लेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

सुरेश सावळेराम लेंभे व राहुल सुरेश लेंभे अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, अकोले तालुक्यातील केळी कोतूळ येथील मनोहर सावळेराम लेंभे हे शेती व मोलमजुरी करतात. त्यांचा सख्खा भाऊ सुरेश हा मुंबईत नोकरी करतो. दोनच दिवसांपूर्वी सुरेश व त्याचा मुलगा राहुल हे गावी आले होते. रविवारी (दि. १६) सायंकाळी ६ वाजता मयत मनोहर यांची पत्नी सोनाबाई व त्यांची दोन मुले शेतातून गुरे घरी घेऊन येत होते. ही गुरे आरोपी सुरेश यांच्या पडीक शेतातून जात असताना सुरेश व त्याचा मुलगा राहुल यांनी ही गुरे अडविली व मागे हाकलून दिली. अर्ध्या तासाने मयत मनोहर हा सुरेश याला जाब विचारायला गेला असता सुरेश याचा मुलगा राहुल याने शेतात काम करायच्या फावड्याने चुलता मनोहर यांच्यावर तीन प्रहार केले. त्यात मनोहर यांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Nephew Murder cousin by beating him with a shovel

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here