नात्याला काळिमा! पुतणीवर काकाचा लैंगिक अत्याचार, गर्भवती राहिल्याने उघडकीस
Breaking News | Pune Crime: पुण्यातून नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अत्याचार करून मुलगी गर्भवती, गर्भपात केल्याचा प्रकार समोर.
पुणे: पुण्यातून नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पंधरा वर्षीय अल्पवयीन पुतणीवर चुलत काकाने लैंगिक अत्याचार केला. पुतणी गर्भवती राहिल्यानंतर जबरदस्तीने गोळ्या खायला देऊन तिचा गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी 28 वर्षीय चुलत काकावर बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
सदर प्रकार नोव्हेंबर 2023 ते 4 फेब्रुवारी 2024 पर्यंतच्या कालावधीत घडला आहे. याबाबत पीडित मुलीच्या 35 वर्षीय आईने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी हा फिर्यादी यांचा चुलत दीर आहे. आरोपीने फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. हा प्रकार घरच्यांना माहीत झाल्यावर त्याला समजावून सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर देखील त्याने मुलीसोबत संपर्क ठेवला. मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यातून पीडित मुलगी गरोदर राहिली. मुलगी गर्भवती राहिल्याचे समजल्यानंतर आरोपीने तिला जबरदस्तीने गोळ्या खायला देऊन तिचा गर्भपात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.
Web Title: Nephew sexually assaulted by cousin, exposed as she became pregnant
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study