Home Ahmednagar Live News प्रेमी युगालांची गळफास घेत आत्महत्या, चिट्ठीत लिहिले असे

प्रेमी युगालांची गळफास घेत आत्महत्या, चिट्ठीत लिहिले असे

Nevasa Suicidal couple commits suicide by strangulation

Ahmednagar News Live | Nevasa Suicide| नेवासा: नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथील एका प्रेमियुगलाने कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर परिसरातील एका यात्री निवासामध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

राहुल विश्वासराव मच्छे वय २५ व प्रियांका विकास भराडे वय २२ दोघेही रा. तामसवाडी ता. नेवासा अशी या आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही एकाच गावाचे आहे. प्रियांकाचा तीन वर्षापूर्वी गावातच एकाशी विवाह झाला होता. गेले काही वर्ष दोघांत प्रेमसंबंध होते. दोघेही २१ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी एस.टी. बसने कोल्हापुरात आले. दोघे अंबाबाई मंदिर परिसरातील ताराबाई रोड वरील एका यात्री निवासामध्ये पती पत्नी या नात्याने ते रूम नंबर ६ मध्ये राहिले.

शुक्रवारी सायंकाळी त्यांनी रूमचा दरवाजा बंद केला. तो उघडला नसल्याने शनिवारी रात्री ११ वाजता यात्री निवास मालकांना शंका आल्याने  त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यांनंतर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे व सहकारी यांनी या यात्री निवासाला भेट दिली. त्यांनी रूमचा दरवाजा तोडून काढला असता दोघांनी पंख्याच्या हुकाला साडीने गाळपास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी रूमची झडती घेतली असता त्यांचे समान आढळून आले. त्याठिकाणी प्रियांकाने लिहिलेल्या चिट्ठीत गावातील एकाचा मोबाईल नंबर लिहून ठेवाला होता. त्यावरून पोलिसांनी नातेवाईकांना संपर्क साधला.

प्रियांकाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिट्ठी मिळाली त्यामध्ये तात्या, मामी ,आत्या, मम्मी माझे सगळे भाऊ, तसेच राहुल दादा, दाजी, बहिण आम्हाला माफ करा. आम्ही प्रेम करतो. पण आमचे प्रेम कोणाला कळले नाही. आम्ही दोघे जगू शकत नसलो तरी एकत्र मरू शकतो. त्यामुळे आम्हाला २०२२ साल पाहायचे नाही. आम्हाला माफ करा. आमचा एकत्रित अंत्यविधी करा. असे चिट्ठीत लिहिले आहे.  

Web Title: Nevasa Suicidal couple commits suicide by strangulation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here