मोबाईलवर फोटो काढताना सातशे फूट दरीत कोसळून नवविवाहितेचा मृत्यू
Satara: धबधब्याचा फोटो काढताना तोल जाऊन सातशे फूट दरीत कोसळल्याने नवविवाहितेचा मृत्यू (Died), महाबळेश्वरच्या केट्स पॉइंटवरील दुर्घटना.
सातारा: महाबळेश्वर केट्स पॉइंट परिसरातील नीडल होल पॉइंट येथील सुरक्षा कठड्यावर बसून मोबाईलवर धबधब्याचा फोटो काढताना तोल जाऊन सातशे फूट दरीत कोसळल्याने नवविवाहितेचा मृत्यू झाला. अंकिता सुनील शिरस्कर (वय २३, सध्या रा. धनकवडी, पुणे) असे मृत्यू झालेल्या या नवविवाहितेचे नाव आहे. केट्स पॉइंट हा महाबळेश्वरपासून सात किलोमीटर अंतरावर आहे. मंगळवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
रेल्वेमध्ये लोको पायलट (चालक) असलेले सुनील ज्ञानदेव शिरस्कर (वय ३०, मूळ रा. उंबरेगव्हाण, ता. जि. धाराशिव) हे पत्नी अंकितासह दुचाकीवरून येथे पर्यटनास आले होते. सोमवारीत्यांनी महाबळेश्वरमधील विविध पॉइंट पाहिले आणि मंगळवारी दुपारी पुण्याकडे जाण्यास निघाले. महाबळेश्वरपासून सहा किलोमीटरवर आले असता, अंकिताने पुन्हा केट्स पॉइंट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पतीने नकार दिल्यानंतरही अंकिताने हट्ट धरल्याने हे दाम्पत्य सायंकाळी साडेचार वाजता केट्स पॉइंट येथे पोहोचले. केट्स पॉइंट पाहून ते नीडल होल व परिसरातील धबधबा पाहण्यासाठी पॉइंटवरील सुरक्षा कठड्यावर बसून फोटो काढत होते. धबधब्याचा फोटो व व्हिडीओ घेताना खाली वाकून पाहत असताना अचानक अंकिता ही कठड्यावरून थेट सातशे फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह दरीतून वर काढण्यात ट्रेकर्सना यश आले.
Web Title: newly married couple died after falling into a 700 feet valley
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App