मुंबई : संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी नितेश राणे (Nitesh Rane) यांची चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार होती. मात्र, चौकशीला नितेश राणे सहकार्य करत नसल्याने त्यांना अटक करणे गरजेचे आहे, तसेच अधिक तपासासाठी वेळ हवा, अशी पोलिसांनी मागणी केली होती. मात्र, त्यानंतर नितेश राणे अज्ञातस्थळी होते. त्यानंतर त्यांनी अटकूपर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण जाण्यास तसेच नियमित जामिनासाठी अर्ज करावा, असे आदेश दिले होते. यासाठी न्यायालयाने नितेश राणे यांना 10 दिवसांची मुदत देखील दिली होती. तसेच तोपर्यंत त्यांना अटक करु नये, असे निर्देश देत दिलासा देखील दिला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले. त्यांच्या समवेत माजी खासदार नीलेश राणे हेही होते. यावेळी नितेश राणे नियमित जामीनासाठी अर्ज करणार आहेत. नितेश राणे यांच्यासोबत त्यांचे वकील सतीश मानशिंदेही उपस्थित होते. त्यामुळे नितेश राणे यांना जामीन मिळणार का? हे देखील लवकरच समजणार आहे.
Web Title : Nitesh Rane appears in court after Supreme Court rejects pre-arrest bail application