Madhya Pradesh Liquor : कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षांत जगभरात हाहाकार माजला होता. ज्यामुळं सर्व काही ठप्प पडलं होतं. परंतु यानंतर सुरू झाली ती दारूची दुकानं. दारूची दुकानं उघडल्यानंतर अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचं पहायला मिळालं होतं. अट्टल तळीरामांचे त्यावेळी चांगलेच वांदे झाल्याचं दिसून आलं होतं.
आता राज्य सरकारने नुकतेच आयात केलेल्या स्काॅच व्हिस्कीच्या किंमतीवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर आता मध्य प्रदेशच्या मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. राज्य सरकार साधारणपणे दर आर्थिक वर्षात उत्पादन शुल्क धोरणात बदल करत असते. यावेळी मध्य प्रदेशातील लोकांसाठी उत्पादन शुल्क धोरणात मोठे बदल केले गेले आहेत. त्यामुळे आता मध्य प्रदेशात दारू बऱ्यापैकी स्वस्त होणार आहे.
इंग्रजी मद्याच्या किरकोळ किंमती या तब्बल 20 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. इंदौर, भोपाळ, जबलपूर आणि ग्वाल्हेर सारख्या मोठा शहरातील सुपर मार्केटमध्ये देखील दारूच्या किरकोळ विक्रीला मान्यता देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर सरकारने घरबसल्या बार उघडण्यासही परवानगी दिली आहे. याकरिता लोकांकरिता घरात दारू ठेवण्याची मर्यादाही सरकारने वाढवली आहे. सध्या राज्यात बिअरचा एक बॉक्स आणि दारूच्या सहा बाटल्या घरी ठेवण्याची परवानगी आहे. मात्र आता चारपटीने मर्यादा वाढवण्यात आल्या आहेत.
नवीन सुधारित धोरणात सरकारने द्राक्षांव्यतिरिक्त जांभूळापासून वाईन बनवण्यास देखील मान्यता दिली आहे. यासोबतच शेतकऱ्यांनी द्राक्षापासून बनवलेली वाईनही टॅक्स फ्री करून टाकली आहे. त्यामुळे मध्यप्रदेशातील मद्यप्रेमींची चांगलीच चंगळ होणार असून त्यांच्यासाठी गोवा ट्रीपचे म्हत्व हे फक्त समुद्रा पुरतेच असणार आहे.
Web Title : Not only Goa but also alcohol has become cheaper in Madhya Pradesh