खळबळजनक! व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज, तरुणाची हत्या करून मृतदेह कालव्यात फेकला
Sangli Crime: व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज पाठवत असल्याचा राग मनात धरून एका खून (Murder) करून मृतदेह कालव्यात फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना, मृतदेह आढळून आल्याने घटना उघडकीस.
सांगली: सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज पाठवत असल्याचा राग मनात धरून एका खून करून मृतदेह कालव्यात फेकण्यात आला असून सात दिवसांनी ही घटना उघडकीस आली आहे. सुशिल सुर्यकांत आठवले या 23 वर्षीय तरुणाचं अपहरण करुन पाच जणांनी त्याची हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह म्हैसाळच्या कालव्यात टाकला. हा मृतदेह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि कवठेमहांकाळ पोलिसांच्या पथकांनी शोधून काढला आहे. या घटनेने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सातव्या दिवशी लंगरपेठ गावाच्या हद्दीत म्हैशाळ योजनेच्या बोगद्यातील विहीरीत सदरचा मृतदेह सापडला. या खुनप्रकरणी पाच संशयितांना अटक केली आहे. कवठेमहांकाळ शहरामधील 23 वर्षीय तरुणाला कवठेमहांकाळ येथील जनावरांच्या बाजारातील शेडजवळ लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला खाजगी अॅम्बूलन्समधून काही अंतरावर नेण्यात आलं. त्याची हत्या करून मृतदेह लोखंडी पुलावरून म्हैसाळ योजनेच्या कालव्यात टाकला होता.
कवठेमहांकाळ येथील चैतन्य नामदेव माने, सुनिल मारुती माने या दोघांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांसमोर हजर होत आपण खून केला असल्याची कबूली दिली. मृतदेहच सापडला नसल्याने पोलिसांना खुनाचा गुन्हा दाखल करता आला नव्हता.
गुरुवारी मेघा सुर्यकांत आठवले यांनी आपला मुलगा सुशिल हा बेपत्ता झाला असल्याची फिर्याद दिली. मेघा आठवले यांच्या फिर्यादीनंतर या पाच जणांच्या विरोधात खुनाच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
चैतन्य नामदेव माने आणि सुनिल मारुती माने यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात दिलं. तर अनुज अमृत माने, अनिल मारुती माने आणि ऑल्विन संजय वाघमारे या तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Web Title: Obscene messages on WhatsApp, Murder the youth and threw the body in the canal
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App