अहमदनगर: पदवी नसताना अनधिकृतपणे दवाखाना थाटून वैद्यकीय उपचार करणार्या डॉक्टरवर गुन्हा
Breaking News | Ahmednagar: वैद्यकीय व्यवसायाची पदवी नसताना अनधिकृतपणे दवाखाना थाटून वैद्यकीय उपचार करणार्या एका डॉक्टरवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
श्रीरामपूर: शासनमान्य मेडिकल काउन्सिलची वैद्यकीय व्यवसायाची पदवी नसताना अनधिकृतपणे दवाखाना थाटून वैद्यकीय उपचार करणार्या एका डॉक्टरवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील गोंधवणी येथील अरुण शिंदे यांनी माळेवाडी येथे एक डॉक्टर वैद्यकीय पदवी नसताना प्रॅक्टीस करत असल्याची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे दिली होती. सदर तक्रारीनंतर तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे, गटविकास अधिकारी प्रविण सिनारे यांनी याबाबत दखल घेत आपल्या पथकासह माळेवाडी येथे सुरू असणार्या ‘श्वास’ क्लिनिक येथे भेट दिली.
त्या ठिकाणी एका गाळ्यामध्ये सागर आहिरे याने हा दवाखाना थाटला होता. गेलेल्या पथकाने त्या गाळ्याची तपासणी केली असता त्या ठिकाणी अॅलोपॅथीची औेषधे, इंजेक्शन, सलाईनच्या बाटल्या, तपासणी टेबल, वाफेचे मशिन आदी साहित्य आढळून आले. सागर आहिरे याची वैद्यकीय पदवी तेथे कोठेही आढळून आली नाही. पथकाने त्या ठिकाणचा फोटो काढून पंचनामा केला. नंतर शरदचंद्रजी पवार होमिओपॅथी मेडीकल कॉलेजच्या प्राचार्यांना पत्र देवून सागर आहिरे याच्याविषयी माहिती विचारली असता 22 नोव्हेंबर 2017 मध्ये सागर आहिरे हा कॉलेजमध्ये प्रवेशित असून बीएचएमएस चतुर्थ वर्षाची हिवाळी 2023 ची परिक्षा त्याने दिलेली आहे. त्यात तो नापास झालेला आहे.
सदर आहिरे नावाच्या डॉक्टरकडे कोणतीही शासनमान्य मेडिकल काउन्सिल व्यवसायाची पदवी नाही, असा अभिप्राय मिळाल्याने, वैद्यकीय व्यवसायाची परवानगी नसताना, पदवी नसताना अनधिकृत पेशंट तपासले. सागर आहिरे याचे विरोधात वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 चे कलम 33 (2) 33 (ए) प्रमाणे श्रीरामपूर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: offense against a doctor practicing medicine without a degree
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study