Home संगमनेर संगमनेर: बिबट्याच्या हल्ल्यात दिड वर्षीय चिमुकली ठार

संगमनेर: बिबट्याच्या हल्ल्यात दिड वर्षीय चिमुकली ठार

Breaking News | Sangamner: संगमनेर तालुक्यात धक्कादायक घटना आज घडली आहे. दीड वर्षीय चिमुकलीला उचलून नेत ठार (Death) केले आहे.

one and a half year old child was killed in a leopard attack

संगमनेर:   आई-वडिलांदेखतच बिबट्याने दिडवर्षीय चिमुकलीला उचलून नेवून ठार  केल्याची दुर्देवी घटना तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे बुधवार (दि. 10 जुलै) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली आहे. ओवी सचिन गडाख असे ठार झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

हिवरगाव पावसा गावांतर्गत असलेल्या गडाख वस्ती येथे सचिन गडाख हे शेतकरी राहात आहे. बुधवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे सचिन त्यांची पत्नी स्वाती व सुनील शांताराम गडाख हे सर्वजण घरासमोर होते. त्याच दरम्यान दिडवर्षीय चिमुकली ओवी ही अंगणात खेळत होती. मात्र याठिकाणी असलेल्या गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक ओवीवर हल्ला  करत तीला उचलून नेवून धूम ठोकली. डोळ्या देखत बिबट्याने ओवीला उचलून नेल्याने सर्वांनी मोठ्याने आरडाओरड करत गिन्नी गवतापर्यंत बिबट्याचा पाठलाग केला. मात्र गिन्नी गवत खूप मोठे होते. त्यामुळे बिबट्या दिसत नव्हता जवळपास पंधरा ते वीस मिनीटे शोध घेतल्यानंतर ओवी जखमी  अवस्थेत गिन्नी गवतात आढळून आली.

त्याचवेळी देवगड विद्यालयाचे शिक्षक संतोष तातळे, मदन माने, दिनेश थोरात हे तेथून जात होते. त्यांनी हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या ओवीला संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. ओवीच्या मानेला बिबट्याने गंभीर जखमा झाल्याने उपचारादरम्यान तीचा दुर्देवी मृत्यू (Death) झाला आहे. घटनेची माहिती समजताच भाग एकचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांनी रूग्णालयात धाव घेत वरिष्ठांना माहिती दिली. बिबट्याच्या दहशतीमुळे गडाख वस्ती परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने  त्वरित याठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: one and a half year old child was killed in a leopard attack

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here