महिलेकडून मुलाचे दीड वर्ष लैंगिक शोषण, संबंध ठेवतोस की देऊ बलात्काराची….
महिलेकडून मुलाचे दीड वर्ष लैंगिक शोषण, संबंध ठेवतोस की देऊ बलात्काराची तक्रार.
पुणे : किशोरवयीन मुलावर एका महिलेने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा व त्याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी पुण्यातील कोंढवा परिसरात उघडकीस आला. यासंदर्भात चौकशीसाठी या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. मे, २०२१ ते नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. महिलेच्या सततच्या धमक्यांमुळे अल्पवयीन मुलाने अखेर कोंढवा पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा आणि महिला शेजारी राहावयास आहेत. महिलेने मुलाला मैत्रीच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर, मुलाला धमकावून त्याच्याशी संबंध ठेवले आणि मोबाइलमध्ये त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर, वेळोवेळी धमकावत त्याला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवायला लावले. तसेच वेळोवेळी ब्लॅकमेल करून ती त्याच्यावर अत्याचार करत होती.
तिने या मुलासोबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर या मुलाने पालकांना सर्व प्रकार सांगितला. त्यांनी या महिलेविरुद्ध रविवारी रीतसर तक्रार दिली. यासंदर्भात या महिलेविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पॉक्सो) गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे हे तपास करीत आहे.
Web Title: One and a half years of sexual abuse of a child by a woman
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App