Home जळगाव साफसफाई करताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एकाचा जागीच मृत्यू

साफसफाई करताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एकाचा जागीच मृत्यू

Accident: साफसफाई करीत असताना पाय घसरून पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना.

One died on the spot after falling from the third floor Accident

जळगाव: जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील नित्यानंद सोसायटी परिसरात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे. उल्हासराव चंद्रराव पाटील (वय-५२ रा. नित्यानंद सोसायटी, मोहाडी रोड, जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील नित्यानंतर सोसायटीच्या उल्हासराव चंद्रराव पाटील हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह तिसऱ्या मजल्यावर वास्तव्याला होते. ते ममुराबाद येथील जिल्हा मृदा सर्व्हेक्षण व मृदा चाचणी विभागात कृषी पर्यवेक्षक म्हणून नोकरीला होते. सध्या दिवाळी असल्याने गुरूवारी सकाळी आठ साडे वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या बाल्कनीमध्ये साफसाफाईचे काम करत होते. साफसाफाई करतांना त्यांचा पाय घसरून तोल गेल्याने ते तिसऱ्या मजल्यावरून खाली पडले. त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच गर्दी जमली होती.

या घटनेची माहिती मिळताच  रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला, याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनिल पाटील करीत आहे.

Web Title: One died on the spot after falling from the third floor Accident

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here