Home संगमनेर संगमनेर तालुक्यात एका जणाचा विहिरीत बुडून मृत्यू

संगमनेर तालुक्यात एका जणाचा विहिरीत बुडून मृत्यू

One drowned in a well in Sangamner taluka

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथील एकाचा जणाचा विहरीत पडून पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. नानासाहेब कोंडाजी मगर वय ४५ या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

 नानासाहेब कोंडाजी मगर हे आपल्या गट नंबर १७८ शेतामध्ये गेले असता ते घरी परतले नाही. सायंकाळ झाली तरी ते घरी न आल्यामुळे कुटुंबीयानी शोधण्यासाठी धावले. यावेळी शेतातील ६० फुट खोल विहिरीत मृतदेह आढळून आला. यामध्ये विहिरीत पाय घसरून पडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच आश्वी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधाकर मांडवकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी हजर झाले. रात्री उशिरा मागारीकांच्या सहायाने नानासाहेब यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविचेदन करण्यासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. यावेळी गावातील रामदास बोरसे, संदीप कडलग, पोलीस पाटील सुनील मगर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: One drowned in a well in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here