Home अकोले अकोले तालुक्यातील एकाला स्वाईन फ्ल्यूची लागण

अकोले तालुक्यातील एकाला स्वाईन फ्ल्यूची लागण

Breaking News | Akole:  एक ४० वर्षीय इसमाला स्वाईन फ्ल्यूची लागण.

One in Akole taluka contracted swine flu

अकोले: तालुक्यात तीन आठवड्यांपूर्वी पाडाळणे येथील एकाचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता हिवरगाव येथील एक ४० वर्षीय इसमाला स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे.

मुंबई आणि महानगरांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, तर अकोले तालुक्यातही रुग्णांची संख्या जास्त आहे. या पार्श्वभूमीवर . हिवरगाव येथे एका इसमास स्वाईन

फ्ल्यूची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. या इसमावर संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी भेट घेतली. अकोले आरोग्य विभाग यामुळे सतर्क झाला आहे. या वृत्तास देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी नागरे यांनी दुजोरा दिला आहे. त्यानी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: One in Akole taluka contracted swine flu

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here