संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
Sangamner Accident: भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने पायी जाणाऱ्या ४४ वर्षीय इसमाला जोरदार धक्का दिल्याने अपघातात एकाचा मृत्यू.
संगमनेर: भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने पायी जाणाऱ्या ४४ वर्षीय इसमाला जोरदार धक्का दिल्याने घडलेल्या या अपघातात सदर इसम गंभीर जखमी झाला होता. प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे उपचार सुरू असतांना या इसमाचे निधन झाले. या प्रकरणी तालुका पोलीसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
सदर अपघात २३ नोव्हेंबर २०२३ रोजी तळेगाव दिघे येथील सबस्टेशन समोरील तळेगाव दिघे लोणी रोडवर घडला होता. रविंद्र दामोदर जगताप (वय ४४, रा. तळेगाव दिघे) यांचे या अपघातात निधन झाले. याबाबत माहिती अशी की, मयत रविंद्र दामोदर जगताप हे तळेगावकडून लोणी रोडकडे पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या भरधाव कारने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत रविंद्र जगताप हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी प्रवरा हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यांचे सोमवारी निधन झाले.
Web Title: One killed in collision with unknown vehicle Accident
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App