अहमदनगर: बस दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू
Breaking News | Ahmednagar: एस.टी. बस व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन एकाचा जागीच मृत्यू.
नेवासा: नेवासा-शेवगाव रस्त्यावर भानसहिवऱ्याजवळ एस.टी. बस व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन एकाचा जागीच मृत्यू, तर एक जखमी झाला आहे. रविवारी (दि. २२) रात्री ९ वाजता हा अपघात झाला.
रविवारी (दि.२२) रात्री ९वाजता नाशिक-पैठण एस.टी. बस (क्र. एम.एच.०९-एफएल-१००६) नाशिकहून पैठणला जात असतांना भानसहिवरा येथील मंगल कार्यालयासमोर एसटी बस व मोटारसायकलची (क्र. एम. एच.१५ सी आर १४६७) समोरासमोर धडक झाली.
त्यात मोटारसायकलवरील अंबादास धोंडीराम काळे (वय ४०, रा. धनगरवाडी, ता. नेवासा) यांचा जागीच मृत्यू झाला, संतोष रायभान वाल्लेकर (वय ३५,) हे जखमी झाले आहेत.
मयत काळे यांच्या मागे पत्नी, दोन मली, एक मुलगा असा परिवार आहे. जखमी वाल्लेकर यांच्यावर नेवासा फाट्यावरील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. नेवासा पोलीसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला.
Web Title: One person died in a bus accident
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study