Home अहमदनगर संगमनेर: दुचाकी थेट विहिरीत कोसळून एक ठार

संगमनेर: दुचाकी थेट विहिरीत कोसळून एक ठार

Breaking News | Ahmednagar Accident:  जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी आलेले पाहुणे पुन्हा घराकडे परतत असताना शिर्डी विमानतळ रस्त्यावर दुचाकी थेट विहिरीत पडल्याने एक जण ठार झाल्याची घटना.

One person was killed after the two-wheeler fell directly into the well Accident

राहाता : तिघे जण दुचाकीवरून घरी परतत असताना अंधारात अंदाज न आल्याने दुचाकी थेट विहिरीत कोसळून एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे. जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी आलेले पाहुणे पुन्हा घराकडे परतत असताना शिर्डी विमानतळ रस्त्यावर दुचाकी थेट विहिरीत पडली. या अपघातात एकजण ठार झाला. भरत शंकर भडांगे – (वय ३२, रा. कोठे-कमळेश्वर, ता. संगमनेर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, केलवड विमानतळाकडे येथून शिर्डी जाणाऱ्या रस्त्याशेजारील तलावालगत ही घटना घडली. सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास अंधारात ही घटना घडली. . केलवड येथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी दुचाकीवर तीन व्यक्ती आल्या. ते पुन्हा घरी परतत असताना अंधारात अंदाज न आल्याने दुचाकी थेट विहिरीत कोसळली. आजूबाजूच्या नागरिकांनी जखमींना श्री साईबाबा रुग्णालयात दाखल केले. मात्र, भरत भडांगे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: One person was killed after the two-wheeler fell directly into the well Accident

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here