Home Ahmednagar Live News Ahmadnagar Crime : गावठी कट्ट्यातून गोळी झाडून एकाची हत्या

Ahmadnagar Crime : गावठी कट्ट्यातून गोळी झाडून एकाची हत्या

Ahmadnagar Crime

Ahmadnagar Crime : राहुरी तालुक्यातील गुंजाळे गावात गोळीबार झाला असून गावठी कट्ट्यातून गोळी झाडुन एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रदिप एकनाथ पागिरे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान राहुरी पोलिस घटना स्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली. गोळीबारा नंतर युवकाला तातडीने नगर मधील एका खाजगी रुग्णालयात नेले असता तो मृत झाला असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मृत युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. घटनेचे कारण सध्या अस्पष्ट असून एक संशयित पोलीसाच्या ताब्यात असल्याचे समजते. पोलिसांनी अजून याबाबत अधिकृत माहिती दिलेली नसली तरी पूर्ववैमनस्यातून सदर प्रकार घडला असण्याची शक्यता असू शकते अशा चर्चा सुरू आहेत. मात्र पोलिसांची या घटनेबाबत सखोल चौकशी सुरू असून लवकरच याबाबत खुलासा केला जाऊ शकतो.

Web Title : One shot dead in Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here