Accident: कांद्याच्या ट्रकला अपघात; तीन ठार, तर एक जण जखमी
Accident: औरंगाबाद-नागपूर महामार्गावर गुरुवारी घडली घटना.
नांदगाव खंडेश्वर: नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील शिंगणापुर फाट्यावर खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात कांद्याचा ट्रक लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकवर समोरून धडकला. या अपघातात २ ट्रकमधील तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. किशोर मगना (२५. दुडिया, राजस्थान), प्रेमप्रकाश रुगाराम (अपघातग्रस्त ट्रकला रस्त्याच्या बाजूला केले. (३०, सरली, राजस्थान) व सर्वेशकुमार झल्लासिंग (३५, घनश्यामपुर, उत्तर प्रदेश) अशी मृतांची नावे असून कुलदीप सुरेशसिंग (२४, शिराडू, उत्तर प्रदेश) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात 5. उपचार सुरू आहेत.
ट्रक (आरजे ०४ जीसी २२०५८) से नागपूरकडून औरंगाबादकडे जात असताना रा. विरुद्ध दिशेने ट्रक (सोजी घड ८९५४) येत होता. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर नसे खट्टे असल्याने खड्डा वाचवण्याच्या ३२ प्रयत्नात दोन्ही ट्रक एकमेकांवर धडकले. इतका जबरदस्त होता की दोघांच्या अंगातून ट्रकमधील सळया आरपार गेल्या.
ट्रकमध्ये फसलेले मृतदेह व जखमींना बाहेर काढण्यासाठी अमरावती मनपा अग्निशामक आणीबाणी वाहन, १ जेसीबी २ क्रेन बोलावण्यात आले होते. यानंतर दोन्ही ट्रक रस्त्यात आडवे झाल्याने २५ किमी अंतरापर्यंत दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जवळपास १३ तासानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली. शिक्षणापूर चौफुलीवर गतिरोधक लावण्यासाठी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण येईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक डॉ. अरविद काळे यांनी दिली.
Web Title: Onion Truck Accident Three killed, one injured