Breaking News | Pune Crime: किरकटवाडीतून दोघांना अटक : १४ किलो अफूची बोंडे जप्त : ग्रामीण पोलिसांची कारवाई.
पुणे : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथे बेकायदा अफूची लागवड केल्याचा प्रकार ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणला. पथकाने छापा टाकून १४ किलो अफूची बोंडे जप्त केली. तसेच, याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. तानाजी शांताराम हगवणे (४८) आणि शिवाजी बबन हगवणे (५५, दोघे रा. किरकटवाडी, सिंहगड रस्ता, ता. हवेली) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
किरकटवाडी येथील नांदोशी रस्त्यावर इंद्रप्रस्थ सोसायटीजवळ आरोपी हगवणे यांची शेती आहे. शेतात बेकायदा अफूची लागवड केल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि हवेली पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. हगवणे यांनी शेतात अफूची लागवड केल्याचे आढळून आले. पोलिसांच्या पथकाने १४ किलो अफूची बोंडे जप्त केली. या अफूच्या बोंडांची किंमत २८ हजार ७०० रुपये आहे.या दोघांविरुद्ध अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अविनाश शिळीमकर, निरीक्षक सचिन वांगडे, सहायक निरीक्षक राहुल वांगडे, विकास अडागळे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, दत्ता तांबे, दगडू वीरकर, दिलीप आंबेकर, अशोक तारू यांच्या पथकाने केली.
Web Title: Opium crop grown in onion farming
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study