महाराष्ट्र राज्य बॉयलर अटेंडंट जनरल कामगार सेनेचा द्वितीय वर्धापन दिनानिमित्त भव्य बॉयलर कामगार मेळाव्याचे आयोजन
Breaking News | Ahmednagar: महाराष्ट्र राज्य बॉयलर अटेंडंट जनरल कामगार सेनेचा द्वितीय वर्धापन दिन.
राहता: महाराष्ट्र राज्य बॉयलर अटेंडंट जनरल कामगार सेनेचा द्वितीय वर्धापन दिनानिमित्त भव्य बॉयलर कामगार मेळाव्याचे गुरुवार दि.२१ मार्च २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता साई पालखी निवारा सभागृह (शिर्डी) या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे.
या मेळाव्यासाठी अध्यक्षीय स्थान उ. श. मदने (सहासंचालक, बाष्पके,संचालनालय, महा. राज्य ) हे भूषविणार आहेत तर उदघाटक गजानन चौगुले (सहासंचालक, बाष्पके, महा. राज्य ) हे करणार असून यावेळी विशेष अतिथी म्हणून सं.लो. कुंभलवार (सहसंचालक, बाष्पके, महा. राज्य )हे उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी बॉयलर उत्पादक/ दुरुस्ती, बॉयलर वापरकर्ते या क्षेत्रातील बॉयलर निरीक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बॉयलर वापरणाऱ्या कंपन्यांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे तसेच तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हा सामाजिक उद्देश विचारात घेऊन हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ज्या बॉयलर अटेंडंटला नोकरी नसेल किंवा बदल हवा असेल त्यांनी कागदपत्रासह उपस्थित रहावे.
यावेळी बॉयलर परीक्षेच्या तयारी साठी तसेच बॉयलर ऑपरेशन मध्ये अधिक सक्षम होण्यासाठी बॉयलर परिचय, बॉयलर अटेंडंट परीक्षा हे पुस्तक विक्री साठी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष अंकुश वाकचौरे यांनी दिली.
या मेळाव्यासाठी बॉयलर क्षेत्रातील सर्वानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष अंकुश वाकचौरे यांनी महाराष्ट्र राज्य बॉयलर अटेंडंट जनरल कामगार सेनेच्या वतीने करण्यात आले.
Web Title: Organized a grand Boiler Worker Meet on the occasion of the anniversary
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study