Home संगमनेर संगमनेर: जनावरे पकडून दिल्याच्या रागातून एकास फायटरने जबर मारहाण

संगमनेर: जनावरे पकडून दिल्याच्या रागातून एकास फायटरने जबर मारहाण

Breaking News | Sangamner Crime: एकाला तिघा जणांनी फायटरचा वापर करीत जबर मारहाण जखमी केले असल्याची घटना.

Out of anger for capturing animals, a fighter beat him up

संगमनेर: ‘इन्होनेही समनापुरके जनावरोपे रेड डाली है’ असे म्हणत एकाला तिघा जणांनी फायटरचा वापर करीत जबर मारहाण जखमी केले असल्याची घटना संगमनेर सुकेवाडी येथून समोर आली असून पोलिसांनी तीन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोहित दयानंद वर्षे (वय वर्ष १६ राहणार सुकेवाडी तालुका संगमनेर) असे जखमी अल्पवयीन मुलाचे नाव असून त्याच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी पुन्हा दाखल केला आहे. शनिवारी दुपारी फिर्यादी मोहित वर्षे हा त्याच्या मित्रासह सुकेवाडी येथून मोटार सायकलवर संगमनेर येथील एका चष्म्याच्या दुकानात चालले असताना पावबाकी रोडवर, घोडेकर मळ्याजवळ पाठीमागून स्प्लेंडर मोटरसायकल एम एच १७, २२ ८९ (नंबर पूर्ण माहित नाही) या गाडीवरून आलेल्या अनोळखी तिघा जणांनी मोटर सायकलला ओव्हरटेक करून थोडे पुढे जाऊन व पुन्हा वळवून येत फिर्यादीच्या मोटरसायकलला धडक दिली. त्यानंतर तिघांपैकी एकाने खिशातून फायटर आढळून फिर्यादीच्या तोंडावर मारहाण करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने तो फटका हुकवला असता खाली पडला. खाली पडल्यावर फायटरने त्याच्या डोक्यावर, डाव्या बाजूस कानावर मारले त्यामुळे डोके फुटून रक्त निघाले आणि त्याच्या मित्राला लाथा बुक्क्‌यांनी मारहाण केली व त्यानंतर मारणारे तिघेजण तिथून पळून गेले. या घटनेनंतर संबंधित मुलांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फर्याद दिली आहे. बजरंग दलाने या घटनेचा निषेध केला आहे. पोलिसांनी त्या समाजकंटकांवर तातडीने कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Out of anger for capturing animals, a fighter beat him up

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here