Home पुणे अंडी चोरल्याचा संशयावरून महिलेस कपडे उतरवण्यास भाग पाडल्याचा संतापजनक प्रकार

अंडी चोरल्याचा संशयावरून महिलेस कपडे उतरवण्यास भाग पाडल्याचा संतापजनक प्रकार

Pune Crime: हॉटेलमधील अंडी चोरल्याचा संशयावरून कपडे उतरवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार महिला कर्मचाऱ्यासोबत घडला. (Molested)

outrageous form of forcing a woman to undress on suspicion of stealing eggs

पुणे: शहरातील येरवडा परिसरात संतापजनक प्रकार समोर आला आहे. हॉटेलमधील अंडी चोरल्याचा संशयावरून कपडे उतरवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार महिला कर्मचाऱ्यासोबत घडला. महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील हॉटेल पार्क ऑर्नेटच्या कुकने हॉटेलमधील ५० वर्षीय महिला कामगारावर अंडी चोरीचा आरोप केला. यानंतर महिलेचा विनयभंग देखील करण्यात आला. मुकेश सिंह पुंन्डील असे विनयभंग करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी पुंडील हा पार्क आॕरनेट या हॉटेलमध्ये किचन मध्ये शेफचे काम करत असून पिडीत महिला याच हॉटेलमध्ये कामाला आहे. आरोपीने पीडित महिलेला तू अंडी कुठे लपवून ठेवले आहेस अशी विचारणा करत तिची अंग झडती घेऊन तिला कपडे उतरण्यास भाग पाडले. पीडित महिलेचा आरोपीने रस्ता अडवून तिच्यावर शेरेबाजी करून तिची विनयभंग देखील केला. याबाबत येरवडा पोलिसात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. येरवडा पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Web Title: outrageous form of forcing a woman to undress on suspicion of stealing eggs

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here