Home Crime News भूत काढायच्या बहाण्याने महिलेवर रात्रभर अत्याचार

भूत काढायच्या बहाण्याने महिलेवर रात्रभर अत्याचार

Yavatmal Crime

Yavatmal Crime : भूतबाधा झाली असून ती काढण्याचा बनाव निर्माण करीत एका विवाहितेवर आदिलाबादच्या मांत्रिकाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आदिलाबाद येथील शेखर अण्णा नामक एका भोंदू बाबावर यवतमाळ शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यवतमाळ शहरातील २३ वर्षीय तरुणी सतत चिडचिड करीत होती. यावरून तिची मानसिकता कुटुंबियांना ठीक वाटत नव्हती. यानंतर एका ओळखीच्या व्यक्तीने आदिलाबाद येथील शेखर अण्णा हा तांत्रिक असून भूत काढतो असे सुचविले. त्यानंतर २३ जानेवारीला शेखर अण्णा दोन साथीदारांना घेऊन यवतमाळात आला.

भोंदू बाबाने लिंबू कापून त्या तरुणीवर मांत्रिकी उपचार करण्याचे नाटक केले. त्यानंतर पूढील चार ते पाच दिवस भोंदू बाबाने त्याच्या दोन साथीदारांचा मदतीने भूत काढण्यासाठी विविध उपचार केले. यानंतर शेखर अण्णाने त्या तरुणीच्या नातेवाईकांना, “शैतान मेरेसे बहुत शक्तीशाली है” असे सांगत तरुणीला एकटं त्याच्याजवळ ठेवण्यास कुटुंबीयांवर दबाव आणला. त्याच्या बहकाव्यात कुटुंबातील लोक आल्याने त्यांनी तरुणीला शेखर अण्णा याच्याजवळ ठेवले.

तरुणी एकटी आपल्या जाळ्यात असल्याचा फायदा घेऊन शेखर अण्णा या भोंदू बाबाने अंगातील भूत काढण्याचे नाटक करून त्या तरुणीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. तसेच याबाबत कोणाला माहिती दिल्यास जिवाने मारण्याची धमकी देखील त्याने दिली. या भयंकर प्रकाराने तरुणी घाबरून गेली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी शेखर अण्णा त्याच्या दोन साथीदारासोबत आदिलाबाद निघून गेला.

भोंदू बाबा गेल्यानंतर घडलेला प्रकार त्या तरुणीने घरी कुटुंबियांना सांगितला. हा प्रकार ऐकून कुटुंबीय देखील बिथरले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कुटुंबीयांनी थेट यवतमाळ शहर पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी त्या शेखर अण्णा नामक भोंदू बाबावर विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी ठाणेदार जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांकडून केला जात आहे.

Web Title : Overnight physical abuse of a woman in Yavatmal due to superstition

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here