Home Ahmednagar Live News Accident: कंटेनर कारचा अपघात, पाच जण जखमी

Accident: कंटेनर कारचा अपघात, पाच जण जखमी

Parner Container car accident, five injured

Ahmednagar | Parner |  पारनेर: अहमदनगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील पवारवाडी येथील धोकादायक वळणावर कंटेनर व कार यांच्यात अपघात (Accident) झाला. या अपघातात कार मधील पाच जण गंभीर जखमी झाले.

याबाबत हरिदास प्रल्हाद उबाळे (रा. भेंडाटाकळी)  यांनी तक्रार दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  स्विप्ट कारने नगरहून पुण्याच्या दिशेने जात असताना सुपाजवळील पवारवाडी परिसरात कंटेनर चालक महंमद सुलेमान याने वाहन बेजबादारपणे चालवत रोड दुभाजकावर धडकून कारला धडक दिली. यात कारमधील मुरलीधर गणपत कानडे, बन्सी दादाराम उबाळे, गंगाराम बाबुराव कादे, दिलीप फडतरे जखमी झाले. तसेच फिर्यादी व कंटेनर चालक महंमद सुलेमान जखमी झाले असून कारचे मोठे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान या अपघाताची माहिती सुपा पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Parner Container car accident, five injured

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here