Home क्राईम पत्नीशी अनैतिक संबंध संशय: मित्रानेच केला तरुणाचा खून

पत्नीशी अनैतिक संबंध संशय: मित्रानेच केला तरुणाचा खून

Parner Suspicion wife Murder of a young man

टाकळी ढोकेश्वर: पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचे संशयावरून जिवलग मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी दिनांक १४ वडगाव सावताळ गाजदिपुर शिवारात उघडकीस आली आहे. पोलिसांनी दहा तासांतच या खुनाचे रहस्य उलगडले आहे. अजित रावसाहेव मदने असे या खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

मयत युवकाचे काका भागुजी खंडू मदने यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी संतोष झावरे रा. टाकळी ढोकेश्वर, किरण जांभकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, अजित मदने हा सोमवारी दिनांक १३ जुलै रात्री ९:३० वाजता घरातून बाहेर पडला होता. शनिवारी साडे दहा वाजता सकाळी त्याचा मृतदेह पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ गाजदीपुरच्या जंगलात आढळून आला. तरुणाचा मारहाण करून खून केल्याचा संशय नातेवाईक यांनी व्यक्त केला. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील व उप अधीक्षक संदीप मिटके व त्यांचे सहकारी यांनी घटना स्थळी भेट दिली होती.

तरुणाच्या कंबरेखाली, पायाला, डोक्याला जबर जखमा केल्या होत्या त्यामुळे मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी करत तपासाची चक्रे फिरविली.

पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले असता त्याचा संतोष झावरे व किरण जांभळकर यांचा वारंवार संवाद झाला असे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

अजित मदनेचे आपल्या पत्नीशी अनैतिक सबंध असल्याचा संशय संतोष झावरे याला होता. त्यामुळे संतोष जाधव याच्या मदतीने अजितचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास दहा तासांत पूर्ण केला.  

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Parner Suspicion wife Murder of a young man

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here