Home Accident News Accident: टेम्पो दुचाकीत भीषण अपघात, मायलेक ठार

Accident: टेम्पो दुचाकीत भीषण अपघात, मायलेक ठार

Parner Terrible accident on a tempo bike

पारनेर | Accident: नगर पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील सुपा येथील म्हसणे फाटा टोल नाक्याजवळ भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक झाल्याने दुचाकीवरील मायलेकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी दुपारी दि. २६ जुलै रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास घडला.

याप्रकरणी सतीश निवृत्ती तरटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हसणे फाटा चौकात पुण्याकडून नगरच्या दिशेने दुचाकी चालली होती. पाठीमागून मालवाहतूक टेम्पो हा भरधाव वेगाने येत होता. म्हसणे फाटा चौकात दुचाकी चालक रांजणगाव मशीदकडे वळत असताना टेम्पोची दुचाकीला धडक बसून अपघात घडला.

अपघातात दुचाकीवरील बळवंत सुखदेव जावक व पारूबाई सुखदेव जवळ रा. रांजणगाव मशीद ता. पारनेर या मायलेकांचा रस्त्यावर पडून जागीच मृत्यू झाला. टेम्पोतील नंदकिशोर गजाजन हिवाळे हे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस घटनास्थळी येऊन पंचनामा करण्यात आला.

Web Title: Parner Terrible accident on a tempo bike

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here