चालत्या एसटी बसमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने प्रवाशाचा मृत्यू
बसमधून प्रवास करत असताना मंचरजवळ एसटी आली असताना प्रवाशाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू (dies).
अवसरी | पुणे : भोसरी ते नाशिक एसटी बसमधून प्रवास करत असताना मंचरजवळ एसटी आली असताना प्रवासी ज्ञानदेव शिवाजी जाधव (वय ५९, रा. मूळगाव कर्नाटक, सध्या रा. भोसरी) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ५) सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत ४० झाले. एसटीतील प्रवाशांनी आरडाओरडा वाय ५६५४) ही एसटी बस पुणे छत्रपती शिवाजीनगर येथून पिंपळगाव बसवंत येथे जाण्यासाठी निघाली. भोसरी येथून ज्ञानदेव शिवाजी जाधव, पत्नी मीना ज्ञानदेव जाधव, मुलगा मयूर ज्ञानदेव जाधव हे त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी चालले होते. राजगुरूनगर एसटी बस स्थानक सोडल्यानंतर पेठ घाटाजवळ बस मंचरच्या दिशेने येत असताना ज्ञानदेव जाधव एसटी यांना अचानक उचकी आली. त्यानंतर ते अस्वस्थ केल्यानंतर चालक एस. के. तिलावट वाहक एस. व्ही. बडे यांनी एसटी गाडी थांबून प्रवाशाची चौकशी केली असता त्यांची पत्नी मीना आणि मुलगा मयूर यांनी वडील ज्ञानदेवांना तातडीने रुग्णालयाची गरज असल्याने तेथे गाडी घेण्यासाठी सांगितले. चालकाने मंचरजवळील मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये बस घेतली. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रताप हिंगे- पाटील आणि रुग्णवाहिका चालक गौरव बारणे यांनी दवाखान्यात ज्ञानदेव चव्हाण यांना नेण्यासाठी मदत केली. डॉक्टरांनी जाधव यांची तपासणी केली असता मृत्यू झाल्याचे घोषित केले.
Web Title: Passenger dies of cardiac arrest in moving ST bus
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App