Home Ahmednagar Live News Accident: अहमदनगर ब्रेकिंग, दहा चाकी टँकर दरीत कोसळून अपघात

Accident: अहमदनगर ब्रेकिंग, दहा चाकी टँकर दरीत कोसळून अपघात

Pathardi Accident Ten wheeler tanker crashes into valley

पाथर्डी |Ahmednagar |Pathardi:  तालुक्यातील माणिकदौंडी घाटात एका धोकादायक वळणावर दहा चाकी टँकरचा अपघात (Accident) होऊन टँकर दरीत जाऊन कोसळल्याची घटना  शनिवारी पहाटे घडली. या अपघातात गाडीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात कोणतेही मोठी जीवित हानी झाली नाही.

माणिकदौंडीकडून हा टँकर पाथर्डीच्या दिशेनं जात असताना घाटात धोकादायक वळणावर टँकरवरचा चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर सुमारे ४० ते ५० फूट खोल दरीत जाऊन कोसळला.

केळवंडी गावापासून घाट सुरु झाल्यांनतर तिसर्‍या वळणावर माणिकदौंडी गावाकडून येणारा हा टँकर ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूचा लोखंडी संरक्षण कठडा तोडून टँकर खाली जाऊन कोसळून पलटी झाला. माणिकदौंडी घाटात अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. या घाटात अनेक धोकादायक वळणे आहेत. सातत्याने अपघाताची मालिका घाटात सुरूच आहे. या घाटातील धोकादायक वळणे काढून रस्त्याच्या बाजूचे हे स्वरंक्षण कठाडे पक्का सिमेंटचे असावेत अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Pathardi Accident Ten wheeler tanker crashes into valley

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here