Home Ahmednagar Live News Theft: भरदिवसा घरफोडी: अडीच लाखांचा ऐवज लंपास

Theft: भरदिवसा घरफोडी: अडीच लाखांचा ऐवज लंपास

Pathardi Theft Lampas looted Rs 2.5 lakh

Pathardi Theft | सोनोशी | पाथर्डी: सोनोशी येथील महेश लक्ष्मण काकडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून एक लाख हजार रुपयांची रोकड व सोने चांदीचा ऐवज असा एकूण चोरट्यांनी दोन लाख ५१ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.

पाथर्डी पोलीस ठाण्यात महेश काकडे यांनी फिर्याद दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

महेश लक्षमण काकडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ५१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शुक्रवारी दुपारी काकडे व त्यांचे कुटुंब शेतात काम करीत होते. मुले शाळेत गेले होते. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने लंपास केले.

शेतातून चार वाजता घरी आल्यावर घराचे कुलूप तोडलेले दिसले. व घराचा दरवाजा उघडलेला होता. घरात जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचे समोर आले. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

Web Title: Pathardi Theft Lampas looted Rs 2.5 lakh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here