Home अहमदनगर तलवारीने दोन गटांत तुंबळ हाणामारी, आठ जण जखमी

तलवारीने दोन गटांत तुंबळ हाणामारी, आठ जण जखमी

Pathrdi fighting between two groups with the sword

पाथर्डी | Pathrdi: पाथर्डी शहरातील अजंठा चौकात दोन गटांत तलवारीने तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये शिरसाठवाडी व भिकनवाडा या दोन दोन गटांत झालेल्या हाणामारीत आठ जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी परस्परविरोधी जीवे ठार प्रयत्न प्रयत्न केल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

यावेळी घडलेल्या या धूमचक्रीत जमावाने केलेल्या दगडफेकीत २० ते २५ दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या घटनेत नागरिकांची मोठी पळापळ झाली. रस्त्यावर दगडांचा खच  पडलेला होता.

या घटनेत पहिल्या फिर्यादीत फिर्यादी गणेश बाळासाहेब शिरसाठ यांना व त्याच्या सोबत असलेले महादेव बाळासाहेब शिरसाठ, नितीन नवनाथ शिरसाठ, नवनाथ यशवंत शिरसाठ,रा. शिरसवाडी हे अजंठा चौकात दुध विक्री करत असताना भिकन वाडी येथील आरोपींनी फिर्यादी व सहकारी यांना तलवार, चाकू, गज, लाठ्या, काठ्याने जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच रस्त्यावर उभे असलेल्या दुचाकींचे मोठे नुकसान केले असे फिर्यादीत म्हंटले आहे.

तर दुसऱ्या फिर्यादीत फिर्यादी अमीर उर्फ मुन्ना निजाम शेख हा त्याचे मालकीच्या गाडीचा धक्का लागल्याच्या रागातून यांचे डोक्यात लोखंडी गजाने शिरसाठवाडी येथील १० ते १२ आरोपींनी  तौफिक शेख, रंगनाथ गायकवाड, जुबेर शेख यांना तलवार, लोखंडी गज, काठ्या यांनी जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केलेबाबत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उप विभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी भेटी दिल्या आहे.

Web Title: Pathrdi fighting between two groups with the sword

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here