Home बीड धक्कादायक! पोटच्या लेकीवर पित्यानेच केला अत्याचार

धक्कादायक! पोटच्या लेकीवर पित्यानेच केला अत्याचार

Breaking News | Beed Crime: बीडमधून बाप लेकीच्या नावाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.

Pat's daughter was abused by her father

बीड: अंबाजोगाई तालुक्यात बापाच्या नावाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. ४१ वर्षीय पित्याने दारू पिऊन, मारहाण करत पोटच्या लेकीवर अत्याचार (abused) केला, त्यात मुलगी आठ महिन्याची गर्भवती राहिली आहे. पोटात दुखायला लागल्यानंतर आईने रूग्णालयात नेले असता मुलीने सर्व आपबिती सांगितली. मुलीच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिडीत मुलीचे कुटुंब ऊसतोडणीचे काम करते. यावर्षी रांजणी कारखान्याला हे कुटुंब ऊसतोड कामगार म्हणून गेले आहे. तेथे काम करत असताना मुलीच्या अचानक पोटात दुखू लागल्याने तिने आईला सांगितले. आईने तिला अंबाजोगाई येथे ६ फेब्रुवारी रोजी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मुलगी गर्भवती असल्याच सांगितलं. अधिक चौकशी केल्यानंतर मुलीने वडिलांनीच मागील आठ महिन्यांपूर्वी घरी आई बाहेर गेल्यानंतर दारू पिऊन, मारहाण करत अत्याचार केल्याची आपबिती सांगितली.

मुलीच्या फिर्यादीवरून नराधम वडीलावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिडीमार पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सोळंके करत आहेत.

Web Title: Pat’s daughter was abused by her father

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here