जरांगेंच्या आडून पवार, उद्धवांचे राजकारण – राज ठाकरे

    Breaking News | Raj Thakare: माझ्या नादी लागू नका, जरांगे यांच्या आडून पवार आणि उद्धव हे राजकारण करत आहेत.

    Pawar under the guise of Jarang, Uddhav's politics – Raj Thackeray

    छत्रपती संभाजीनगर:  महाराष्ट्रातील जातीपातीचे राजकारण टोकाला पोहोचले आहे. जरांगे यांच्या आडून पवार आणि उद्धव हे राजकारण करत आहेत. काल बीड येथे जे घडलं त्यामागे जरांगे नसून ठाकरे आणि पवार असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा महागात पडेल,’ असा इशारा दिला.

    आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ठाकरे शनिवारी येथे आले होते. त्यावेळी ते म्हणाले, राज ठाकरे मराठा आरक्षणाविरोधात आहे, अशा बातम्या पेरल्या गेल्या. खरे तर जातीपातीचा विचार न करता सर्वच गरिबांना आरक्षण मिळाले पाहिजे.

    त्यांचा तर दंगली घडविण्याचा उद्देश

    शरद पवार यांच्यासारख्या नेत्याने महाराष्ट्राचा मणिपूर होईल असे विधान करणे म्हणजे त्यांचा उद्देश दंगली घडविण्याचा असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

    चार पक्षांचे वाटे होईना,

    मी कशाला जाऊ… लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणारे राज ठाकरे हे आता महायुतीविरोधात प्रचार करणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना ठाकरे म्हणाले, आधीच या चार पक्षांच्या जागा वाटपाचे वाटे होईना, असे असताना मी कशाला तिकडे जाऊ, असे त्यांनी नमूद केले.

    Web Title: Pawar under the guise of Jarang, Uddhav’s politics – Raj Thackeray

    See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here