Home संगमनेर संगमनेर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकास अटक

संगमनेर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकास अटक

Breaking News | Sangamner Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीला सहाय्य करणाऱ्या चौथ्या आरोपीला जेरबंद करण्यास यश आले आहे.

person was arrested in the case of abusing a minor girl

संगमनेर: दहावीच्या परीक्षेचे रिसीट काढण्यासाठी साकुर गावात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बळजबरी करून साकुरच्या रुबाब पान शॉप मध्ये तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानंतर या मुलीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार चार महिन्यांपूर्वी समोर आला होता. यातील मुख्य आरोपीला सहाय्य करणाऱ्या चौथ्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना सुमारे चार महिन्यांनी यश आले आहे.

विजय शिवाजी खेमनर (वय २९ वर्ष रा. हिरेवाडी, साकुर) असे पोलिसांनी पकडलेल्या चौथ्या आरोपीचे नाव असून त्याला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटना उघडकीस आल्यापासून हा आरोपी फरार होता.

दहावीत शिकणारी मुलगी परीक्षेचे रिसीट आणण्यासाठी साकुर गावात आली होती. यावेळी आरोपी सौरभ खेमनर याने तिला बळजबरी करत रुबाब पान शॉप मध्ये नेले. पान शॉप मध्ये तिच्या तोंडाला रुमाल बांधून तसेच दोन्ही हात बांधून तिच्यावर अत्याचार केला. यासाठी अन्य आरोपीने त्याला मदत केली. अत्याचारावेळी आरोपी योगेश खेमनर याने पान शॉपचे शटर बंद करून घेत बाहेरून कुलूप लावले होते.

तर प्रशांत भडांगे व विजय खेमनर यांनी पान शॉपच्या शटरबाहेर थांबून देखरेख करत सौरभ खेमनर याला पीडित मुलीवर अत्याचार करण्यासाठी मदत केली. यावेळी तेथे आलेल्या बाजीनाथ दातीर याला ‘तू येथे का आला, निघून जा’ अशी विचारणा करत त्याला दमबाजी केली. दरम्यान झालेल्या अत्याचारामुळे इज्जत गेली म्हणून पीडित मुलीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली होती. याप्रकरणी मुख्य आरोपीसह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. विजय खेमनर याला १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: person was arrested in the case of abusing a minor girl

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here