अहमदनगर ब्रेकिंग: पेट्रोल पंप मॅनेजरची धारदार शस्त्राने वार करत हत्या
Ahmednagar Crime News: किरकोळ वादातून पेट्रोल पंप मॅनेजरची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात.
अहमदनगर: किरकोळ वादातून पेट्रोल पंप मॅनेजरची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात समोर आली आहे. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारातील घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात पेट्रोल पंप मॅनेजरची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली आहे. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावाच्या शिवारात ही घटना घडली. यामध्ये एक कर्मचारी जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
काल रात्री ९ च्या सुमारास गुरूराज पंपावर तीन तरुण दुचाकीवरुन आले. यावेळी पेट्रोल पंपाचे कर्मचारी आणि या तरुणांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. ज्यानंतर या तरुणांनी थेट चाकूने पेट्रोल पंपाचे मॅनेजर भोजराज घनघाव याच्यावर धारदार शस्राने हल्ला ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर तात्काळ त्याला रुग्णालयात हलवण्यात आले मात्र रस्त्यातच या युवकाचा मृत्यू झाला.
घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून या हल्ल्यात संतोष मोरे हा कर्मचारीही गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. अधिक तपास सुरू केला आहे. या हत्येचा संपूर्ण थरार सीसीटिव्हीत कैद झाला असून किरकोळ कारणावरुन बाचाबाची झाल्यानंतर हा हल्ला करण्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
Web Title: Petrol pump manager Murder to death with a sharp weapon
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App