Home Crime News धोका !!! मैत्रिणीचे लग्न मोडण्यासाठी सोशल मीडियावर अपलोड केले मित्रासोबतचे फोटो

धोका !!! मैत्रिणीचे लग्न मोडण्यासाठी सोशल मीडियावर अपलोड केले मित्रासोबतचे फोटो

Jalgaon crime

जळगाव : अलीकडल्या काळात सोशल मीडिया वापरण्याच्या बाबतीत तरुणाईचा कल प्रचंड वाढला आहे. त्यामुळे जगात कुठूनही कोणाशीही संवाद साधणं अगदी सोपं झालं आहे. मात्र त्याचा दुष्परिणाम असा की, सोशल मीडियावरून होणाऱ्या फसवणुकीचं प्रमाण देखील आता तितकंच वाढलं आहे. अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे.

रावेर तालुक्यातील एका मैत्रीणीचे लग्न मोडावे यासाठी तिच्याच जवळच्या अज्ञात व्यक्तीने तिचे मित्रासोबत असलेले फोटो सोशल मीडियावर टाकून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर सेल मध्ये गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील संबंधित १९ वर्षीय तरुणी शिक्षण घेत असून सध्या तिचे लग्न जुळले आहे. तरुणीचे लग्न मोडावे या कारणाने एका व्यक्तीने सोशल मीडियावर त्या तरुणीचे तिच्या मित्रासोबतचे फोटो अपलोड केले. तसेच तरुणीचे लग्न जुळलेल्या तिच्या होणाऱ्या पतीलाही ते फोटो पाठवून तिची बदनामी केली. अशी तक्रार तरुणीने जळगाव सायबर पोलिसात दिली असून त्यावरुन अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.

Web Title – Photos with a friend uploaded on social media to break up a friend’s wedding

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here