संगमनेर: घर बांधण्यासाठी माहेरच्यांकडून पैसे आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ
Breaking News | Sangamner: विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती सासू-सासऱ्यांसह चार जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. (For money).
संगमनेर : लग्नामध्ये हुंडा दिला नाही म्हणून घर बांधण्यासाठी माहेरच्यांकडून पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती सासू-सासऱ्यांसह चार जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विवाहितेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, , हल्ली संगमनेर शहरातील मालदाड रोड येथे असलेल्या सुवर्णा संजय भुसारी (वय ३४ वर्ष) हिचा विवाह वीरगाव ता. वैजापूर येथील संजय यशवंत भुसारी याच्यासोबत झाला होता. मात्र विवाहितेच्या माहेरच्यांनी लग्न व्यवस्थित केले नाही, लग्नात हुंडा दिला नाही तसेच विवाहितेला शेती काम करता येत नाही अशी कारणे देत तिने माहेरच्यांकडून घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी तिचा शारीरिक, मानसिक छळ करण्यात आला तसेच शिवीगाळ करत मारहाण केली.
यामुळे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विवाहिता सुवर्ण भुसारी हिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संजय यशवंत भुसारी, सासू सुमन यशवंत भुसारी, सासरा यशवंत कोंडाजी भुसारी व नानासाहेब यशवंत भुसारी (सर्व रा. वीरगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Physical and mental harassment of the married woman to get money
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study