संगमनेर: गोवंशांची वाहतूक करताना पिकअप पकडला! पोलिसांचा छापा
Breaking News | Sangamner Crime: रस्त्यावर गोवंशांची वाहतूक होत असलेली पिकअप हे चारचाकी वाहन संगमनेर तालुका पोलिसांनी पकडण्यात आल्याची कारवाई, एकावर गुन्हा.
संगमनेर : तळेगाव दिघे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रस्त्यावर गोवंशांची वाहतूक होत असलेली पिकअप हे चारचाकी वाहन संगमनेर तालुका पोलिसांनी पकडण्यात आल्याची कारवाई करण्यात आली आहे. या वाहनातून तब्बल ३६ गोवंशांची वाहतूक होत होती. गुरुवारी (दि.०७) रात्री ९.३० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी राहाता तालुक्यातील ममदापूर येथील एकावर गुन्हा दाखल झाला आहे. अबुबकर इसाह शहा (रा. ममदापूर, ता. राहाता) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस कॉन्स्टेबल अनिल बाळासाहेब उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
माहिती अशी की, गोवंश जनावरांची होत असल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे- पाटील यांना मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. पिकअप (एम. एच. १७, बी. वाय. ५३९९) हे वाहन पकडले. अबुबकर शहा हा गोवंशांची वाहतूक करताना मिळून आला. अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पालवे करीत आहेत.
Web Title: Pickup caught while transporting cattle! Police raid
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study