17 वर्षांची प्रतीक्षा, अकोलेतील पिंपरकणे पुल अखेर सर्वांसाठी खुला, 60 किमीचा प्रवास वाचणार
Akole News: अखेर आज या पुलाचं काम पूर्ण होऊन राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा.
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील 2006 साली मंजूर झालेला पिंपरकणे पुल अखेर सर्वसामान्यांच्या स्वागतासाठी खुला करण्यात आला आहे. अवघ्या 560 मीटरचा पूल पूर्ण होण्यासाठी तब्बल 17 वर्ष लागली. अखेर आज या पुलाचं काम पूर्ण होऊन राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. या पुलामुळे आदिवासी डोंगराळ भागातील 25 गावांचा फायदा होणार असून 60 किमीचा प्रवास वाचणार आहे.
अकोले तालुक्यातील राजूर ते पिंपरकने येथील पुलाचा लोकार्पण आज सोहळा पार पडला आहे. 2006 साली मान्यता मिळलेला हा पूल व्हायला 2023 उजाडलं असून आदिवासी भागासाठी हा पूल अत्यंत महत्वाचा ठरणारा आहे. आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आलं आहे. कार्यक्रमानंतर राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांनी आनंदोत्सव साजरा करत आदिवासी गीतावर ठेका धरला. तब्बल सतरा वर्षांनंतर १७ गावातील रस्त्याची समस्या सुटल्याने आदिवासी बांधवांनी देखील आनंदोत्सव साजरा केला.
आजूबाजूच्या आदिवासी भागात आरोग्य व्यवस्था कमतरता असल्याने या पुलामुळे आदिवासी ग्रामस्थांना मोठा फायदा होणार आहे. अनेक शाळकरी विद्यार्थ्यांना आता शाळेपासून वंचित राहावे लागनार नाही अस मत आमदार डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्त केलं. प्रवरा नदीवरील निळवंडे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये 200 फूट उंची असणाऱ्या या पुलामुळे परिसरातील पर्यटनसुद्धा वाढणार असून या पुलावरून सनरेज आणि सनसेट पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी ग्रेडी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आदिवासी समाजातील अनेक गांवाची मुख्य बाजारपेठ ही राजुर असुन शेतीमाल विक्री व खरेदी यासाठी शेतकरी वर्गास मोठ्या अडचणी सहन कराव्या लागतात. याच कारणाने हा पुल महत्वाचा आहे. मात्र आता या पुलामुळे सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.
Web Title: Pimparkane Bridge in Akole is finally open to all
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App