अहमदनगर: वादातून एकावर पिस्टलमधून गोळीबार
Breaking News | Ahmednagar: कौटुंबिक वादातून एका व्यक्तीवर गोळीबार झाल्याची घटना.
पाथर्डी : कौटुंबिक वादातून एका व्यक्तीवर गोळीबार झाल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील हत्राळ गावात बुधवारी (दि.२६) रात्री आठच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी माणिक सुखदेव केदार (वय ५५) हे या घटनेत गंभीररित्या जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर गोळी झाडणारा सुभाष विष्णू बडे (वय ३०, रा. येळी, पाथर्डी) याला परिसरातील लोकांनी ताब्यात घेऊन चोप दिला. पकडून दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी बडे याला ताब्यात घेतले.
बुधवारी रात्री आठच्या सुमारास हत्राळ गावातील माणिक सुखदेव केदार कुटुंबासह केदार वस्तीवर राहते. राहत्या घरात माणिक केदार जेवण करत होते. त्यावेळी सुभाष विष्णू बडे हा तेथे आला. बडे याने त्याच्याकडील पिस्टलमधून माणिक केदार यांच्यावर गोळी झाडली. गोळी केदार यांच्या डाव्या बाजूला बरगडीच्या वरती लागली. त्यात ते गंभीर जखमी झाले. तातडीने केदार यांना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गोळी शरीरामध्ये असल्याने त्यांना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर, अमोल आव्हाड, सुहास गायकवाड, संदीप बडे यांच्यासह पोलिस पथक हत्राळ गावात दाखल झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
घटनास्थळाहून पोलिसांनी कोयता, पिस्टल पोलिसांनी जप्त केले आहे. आरोपी बडे याला गावातील ग्रामस्थांनी चोप देऊन बांधून ठेवले. यात आरोपी सुभाष बडेही जखमी झाला आहे. हल्ल्याचे नेमके कारण फिर्याद दाखल झाल्यानंतर समोर येण्याची शक्यता आहे.
Web Title: pistol was fired at one over an argument
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study