Home Akole News अकोले ते बाजार समिती रस्त्याची दुर्दशा, लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी बांधली डोळ्यावर पट्टी 

अकोले ते बाजार समिती रस्त्याची दुर्दशा, लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी बांधली डोळ्यावर पट्टी 

plight of the Akole to Bazar Samiti road
अकोले  ते बाजार समिती पर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी अशा प्रकारची दुर्दशा अनुभवयास  मिळत आहे. plight of the Akole to Bazar Samiti road (छाया-अमोल वैद्य ,अकोले)
अकोले(प्रतिनिधी): अकोले देवठाण-समशेरपुर कड़े जाणाऱ्या बाजार समिती पर्यंतच्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.
सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर  या रस्त्यावर ठीकठिकाणी  मोठमोठे खड्डे पडले आहेत. पहिल्याच पावसाच्या पाण्याने  अगस्ति  कॉर्नर जवळ व बाजार समिती च्या अलिकड़े  मोठ्या प्रमाणावर  पाणी साठले आहे.हे पाणी पाहता रस्त्यावर तलाव केला की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे.  पर्यायाने  पादचारी, दुचाकी व चार चाकी वाहन चालकांची मोठी कसरत येथे पहावयास  मिळत आहे.या रस्त्यावरून ये जा करताना तालुक्याचे लोक प्रतिनिधी, सर्व पक्षीय पुढारी, सार्वजिनक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी  जणू  काही डोळ्यावर  पट्टी बांधली की काय असा संतप्त सवाल नागरिक करू लागले आहे.
अकोले ते बाजार समिती पर्यंतच्या प्रमुख रस्त्याची  ही अवस्था तर तालुक्यातील ग्रामीण भागातील अन्य रस्त्याची काय परिस्थिति असेल याचा अंदाज आल्याशिवाय राहणार नाही. कृषि उतपन्न बाजार समिती, रेडे,सुगाव,कुंभेफळ,कळस खुर्द,तसेच देवठान, वीरगाव,गणोरे, देवठाण ,समशेरपुर  या प्रमुख  गावांत जाणाऱ्या येणाऱ्या या रस्त्यावर मोठी गर्दी असते. पावसाळ्यापूर्वी लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व जागृत नागरिक यांनी या रस्त्याची अवस्था कायम अशा प्रकारची असते याची कल्पना दिली होती. मात्र या रस्त्यावर अकोले -राजुर प्रमाणे  लोक बली जाण्याची अधिकारी वाट पहात आहे का ? असे एक ना अनेक सवाल उपस्थित होत आहे.
सुमारे महीनाभरापूर्वी सुगाव  खुर्द येथे ऑक्सीजन युक्त कोविड सेंटर सुरु करण्यात आले.त्या अगोदर अगस्ति आश्रम व खानापुर येथेही करोना च्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमिवर कोविड सेंटर सुरु केले गेले.या कोविड सेंटरला अनेक अत्यवस्थ रुग्ण यांची  ने आण केली जात असते.तसेच नाशिक,सिन्नरला जाण्यासाठी मधला मार्ग म्हणून याच रस्त्याचा वापर केला जात असतो. अकोले तालुक्यातील अनेक अत्यवस्थ रुग्ण हे उपचारा साठी या परिसरातून ये जा करत असतात.
अकोले कडून पुढे जाताना प्रवरा नदिवरील मोठ्या पुलाच्या पुढील बाजूला दरवर्षी मोठ मोठे खड्डे पडलेले असतात.त्या खडड्यांत परिसरातील लोकांचे व पावसाचे पाणी साठत असल्याने या रस्त्यावर पडलेल्या असंख्य खडड्यांचा अंदाज वाहन चालकांना  येत नाही त्यामुळे येथे अनेक छोटे मोठे अपघात ही नित्याचीच बाब झाली आहे.पूला पुढील चढ़ पार केल्यावर लगेचच काही अंतरावर तलाव सदृश्य स्थिती व जैसे थी परिस्थिती पुढे बाजार समिती च्या तोंडाशी असलेल्या रस्त्यावर पाहायला मिळत आहे.
एकूणच लोकप्रतिनिधी, सर्व पक्षीय पुढारी, कार्यकर्ते,सार्वजनीक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना या परिसरातील नागरिकांचे ,रुगनांचे काहीही घेणे देने राहिले नसल्याचे चित्र सध्या या रस्त्यावर प्रवास करणारे लोक पहात आहेत. या महत्वाच्या रस्त्याची तातडीने सुधारना न झाल्यास भविष्य काळात मोठे जन आंदोलन छेडन्याचा इशारा या रस्त्याला  वैतागलेल्या नागरिक व वाहन चालकांकडून देण्यात आला आहे.
Web Title: plight of the Akole to Bazar Samiti road

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here