अल्पवयीन मुलीसह आरोपीला सुरतमधून पोलिसांनी केले अटक
Breaking News | Ahilyanagar: १७ वर्षीय मुलीचे आरोपीने केले होते अपहरण.

अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यातील एका १७ वर्षीय मुलीसह आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरत येथून अटक केली. नीलेश उर्फ सोन्या अशोक सावंत (वय २९, रा. चिंभळी, ता. श्रीगोंदा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील एका १७ वर्षीय मुलीचे आरोपीने अपहरण केले होते. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. मुलीच्या नातेवाइकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अल्पवयीन मुलीचा शोध
घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने आरोपींचा शोध घेतला. अल्पवयीन मुलीचे अपहरण नीलेश सावंत याने केले असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता तो सुरत (गुजरात) मध्ये असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सुरत शहरात जावून आरोपीचा शोध घेतला. अल्पवयीन मुलीसह आरोपीला सुरत येथून ताब्यात घेण्यात आले. त्याला पुढील तपासासाठी श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.
Breaking News: Police arrest accused along with minor girl from Surat


















































