Home Crime News Pune Crime : महिलांचे अश्लील स्वरूपात फोटो बनवणाऱ्यास पोलिसांनी केली अटक

Pune Crime : महिलांचे अश्लील स्वरूपात फोटो बनवणाऱ्यास पोलिसांनी केली अटक

Police arrest man for making obscene photos of women

पुणे Pune Crime : महिला व मुलींचे फोटो काढून ते मोर्फिंग करून सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या एका विकृतास पुण्यातील खडकी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वस्तीत राहणाऱ्या महिलांचे फोटो काढत तो नग्न फोटोसह जुळवून त्या फोटोला अश्लील बनवून तो इंटरनेटवर पसरवीत होता. याची दखल राज्य महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे.

पुण्यातील खडकी येथे राहणारा २५ वर्षीय तरुण हा घृणास्पद प्रकार करीत होता. त्याने अनेक मुलींच्या फोटोचा वापर करून दुष्कृत्य केले होते. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी त्या विकृत तरुणास अटक केली आहे. 2019 पासूनच हा तरुण अशा पद्धतीने फोटो व्हायरल करीत असल्याचे तपासात समोर आले आहे. सदर बाब गंभीर स्वरूपाची असल्याने कारवाईचा अहवाल महिला आयोग कार्यालयास पाठवावा अशी मागणी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केली आहे.

महिलांच्या फोटोसोबत छेडछाड करून त्यांना अश्लील स्वरूप देऊन समाज माध्यमांवर प्रसिद्ध केल्याने अनेक मुलींना नाहक बदनामीला सामोरे जावे लागते. इंटरनेटवर देखील अश्या पद्धतीचे फोटो मोठ्या प्रमाणावर अपलोड केले जातात. यात बहुतांश सिने अभिनेत्री यांनी या अगोदर तक्रारी देखील दिल्या आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या गुन्ह्याला आळा घालणे व गंभीर शासन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title : Police arrest man for making obscene photos of women

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here