Home पुणे मुलीसोबत अश्लील चाळे, सावत्र बापाला पोलिसांकडून अटक

मुलीसोबत अश्लील चाळे, सावत्र बापाला पोलिसांकडून अटक

Breaking News | Pune Crime:  सावत्र बापाने 19 वर्षीय मुलीशी अश्‍लील चाळे करून विनयभंग केला केल्याची घटना समोर.

Police arrested stepfather for indecent act with daughter

पुणे : सावत्र बापाने 19 वर्षीय मुलीशी अश्‍लील चाळे करून विनयभंग केला केल्याची घटना समोर आली आहे. बापलेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी ही घटना हवेली तालुक्यातील बकोरी गावात घडली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी सावत्र बापाला अटक केली आहे. हा प्रकार जुलै 2023 ते 17 मार्च 2024 या कालावधीत पिडितेच्या घरात घडला आहे

याप्रकरणी19 वर्षीय पीडित मुलीने मंगळवारी (दि.19) लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन येरवडा परिसरात राहणाऱ्या 27 वर्षीय सावत्र बापावर आयपीसी 354, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  पीडित मुलीच्या आईने आरोपीसोबत दुसरे लग्न केले आहे. लग्नानंतर आरोपीची वाईट नजर पीडित मुलीवर पडली.

सापत्र बापाने मुलीला अश्लील बोलून शारीरिक सुखाची मागणी केली. तसेच तिच्यासोबत अश्लील चाळे करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याबाबत आईला सांगितले तर तुला व तुझ्या आईला मारुन टाकण्याची धमकी आरोपीने दिली. दरम्यान फिर्यादी तरुणीचे लग्न जमले. यावरुन आरोपीने फिर्यादी च्या आईला लग्न कोणी ठरवले असे बोलून शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

Web Title: Police arrested stepfather for indecent act with daughter

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here