Home अहमदनगर अहमदनगर: पोलिस कॉन्स्टेबलने काढली महिला पोलिसाची छेड

अहमदनगर: पोलिस कॉन्स्टेबलने काढली महिला पोलिसाची छेड

Ahmednagar Crime News:  पोलिस कॉन्स्टेबलने महिला पोलिसाची छेड काढल्याची घटना.

police constable teased a woman police officer Crime Filed

शेवगाव: पोलिस कॉन्स्टेबलने महिला पोलिसाची छेड काढल्याची घटना मागील महिन्यात घडली होती. पीडितेच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास विशाखा समितीकडे सोपविण्यात आला. समितीच्या चौकशीनंतर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने संबंधित कॉन्स्टेबलविरोधात मंगळवारी (दि. १०) शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील यशवंत रत्नपारखी असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मागील महिन्यात १४ सप्टेंबरला महिला पोलिस कर्मचारी यांना लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले होते. पीडितेने आरोपी रत्नपारखी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात वरिष्ठांकडे धाव घेतली होती. संबंधित तक्रारीची चौकशी करण्यासाठी हे प्रकरण विशाखा समितीकडे सोपविण्यात आले होते. दरम्यान, रत्नपारखी याच्याविरोधात तक्रार केल्यानंतर त्याची तातडीने जिल्हा मुख्यालयात बदली करण्यात आली होती.

दरम्यान, या प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या लेखी आदेशान्वये रत्नपारखी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक  तपास पोलिस सहायक निरीक्षक नीरज बोकील हे करत आहेत.

Web Title: police constable teased a woman police officer Crime Filed

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here