Home संगमनेर संगमनेर तालुक्यातील तो कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त

संगमनेर तालुक्यातील तो कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त

Breaking News | Sangamner: केमिकल टाकून बनावट ताडी तयार करणारा संगमनेर तालुक्यातील एक कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त.

Police destroyed a factory in Sangamner taluka that manufactured fake 

पुणे: पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणात मोठी कारवाई केल्यानंतर आता, पुणे शहरात केमिकल टाकून बनावट ताडी तयार करणाऱ्यांचा पर्दाफाश करत यासाठी लागणाऱ्या केमिकल पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा देखील पर्दाफाश करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एक कारखाना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उद्धवस्त केला आहे. सातवी पास व्यक्ती हा कारखाना चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुणे पोलिसांनी तब्बल दोन हजार तीनशे किलो क्लोरल हायड्रेट पुणे पावडर (केमिकल) जप्त केले असून त्याची किंमत ६० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. पुणे पोलिसांनी केमिकल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी प्रयोगशाळेतील उपकरणे देखील जप्त केली आहे.

आरोपी निलेश विलास बांगर (वय ४०, रा पिंपळगाव खडकी, कुरकुटे मळा, मंचर ता आंबेगाव, पुणे), प्रल्हाद रंगनाथ भंडारी (वय ६१, रा केशवनगर, मुंढवा, पुणे) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही काळापासून पुण्यात बनावट ताडी तयार करण्यासाठी लागणारे केमिकल विक्री होत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. सुरवातीला मुंढव्यतील आरोपी प्रल्हाद रंगनाथ भंडारी याच्याकडे विषारी बनावट ताडी तयार करण्यासाठी लागणारे क्लोरल हायड्रेडचा मोठा साठा मिळून आला. त्याची सखोल चौकशी केली असता. हा माल त्याला आरोपी नीलेश बांगरने पुरवल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पुणे पोलिसांनी आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खंडकी येथील त्याच्या घरावर छापा टाकून केमिकलचे १४२ किलो ७५० ग्रॅम वजनाचे ५ पोते असा २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीच्या अधिकच्या चौकशीत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील वेल्हाळे येथे बांगरने केमिकल विषारी ताडी तयार करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरल हायड्रेड रसायन पावडर तयार करण्याचा अवैध कारखाना सुरू केल्याचे उघडकीस आले.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्य ठिकाणी जाऊन छापा टाकून २ हजार २१७.५ किलो तयार क्लोरल हायड्रेड आणि ते तयार करण्यासाठी लागणारे उपकरणे असा ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन हा अवैध रसायन कारखाना सिल केला. याबाबत पुढील तपास पुणे पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे.

Web Title: Police destroyed a factory in Sangamner taluka that manufactured fake 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here