Home जालना पोलीस हेड कॉन्स्टेबल लाचेच्या जाळ्यात

पोलीस हेड कॉन्स्टेबल लाचेच्या जाळ्यात

Breaking News | Jalna Crime: एका गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून १२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या हेड कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.३) रंगेहाथ अटक.

Police head constable in bribery trap

जालना : अंबड ठाण्यात दाखल एका गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून १२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या हेड कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.३) रंगेहाथ अटक केली.

प्रताप रेवाजी चव्हाण (वय ५६, रा. नंदनवन कॉलनी, जालना), असे लाच स्वीकारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार यांच्या विरुध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल प्रताप चव्हाण याच्याकडे होता. सदर गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी कॉन्स्टेबल चव्हाण याने तक्रारदार यांच्याकडे १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यानंतर आज सापळा लावून कॉन्स्टेबल प्रताप चव्हाण याच्या तक्रारदार यांच्याकडून १२ हजारांची लाच स्वीकारताना अटक केली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक बी. एस. जाधवर, अंमलदार गजानन घायवट, गणेश चेके, गणेश बुजाडे, शिवलिंग खुळे. विठ्ठल कापसे आदींनी ही कारवाई केली.

Web Title: Police head constable in bribery trap

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here