Home Maharashtra News मोठी बातमी: शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

मोठी बातमी: शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

Student Protest

Student Protest : मुंबईतील धारावी येथे सुरु असणाऱ्या विद्यार्थी आंदोलनाला आता हिंसक वळण मिळालं आहे. शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर हजारो विद्यार्थी जमले असता त्यांच्यावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बहुतांश शिक्षण ऑनलाईन झाल्यामुळं परीक्षाही ऑनलाईनच असाव्यात अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती. पण, या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळाल्यानं नवा वाद उभा राहिला असून त्यावरून राजकारण तापू लागलं आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घराबाहेर विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्ज बद्दल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. एका व्हायरल मेसेजनंतर अनेक दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये याची कुजबूज सुरु झाली होती. आणि त्यानंतर अनेक विद्यार्थी धारावीमध्ये एकत्र आले. हजारोंच्या संख्येने आलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी परत जाण्यास सांगितलं होत. मात्र असे न झाल्याने पोलिसां विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केला.

धारावी सारख्या ठिकाणी इतक्या संख्येनं विद्यार्थी शिक्षण मंत्र्यांच्या घराबाहेर एकत्र येण्याची ही घटना तणावाची परिस्थिती उदभवून गेली आहे. पोलिसांनी जमावाला पांगवलं असलं तरीही इथं बळाचा वापर केल्यामुळं आता संमिश्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.

विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका

विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या घटनेचा संदर्भ देत राज्यात हिटलरशाही सुरु असल्याचा निशाणा दरेकर यांनी साधला. परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यासाठी हे आंदोलन विद्यार्थ्यांनी केलं असता शिक्षणमंत्र्याच्या घराबाहेर जमलेल्या या विद्यार्थांवर लाठीचार्ज करण्यात आला. विरोधात जाणाऱ्या प्रत्येकाला सरकारकडून मिळणारी ही वागणूक पाहता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

शाळा आणि कॉलेजं ऑनलाईन घेणार असाल, तर परीक्षा ऑफलाईन का ? या मुद्द्यावरून परीक्षा ऑनलाईन झाल्या पाहिजेत अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. एका सोशल मीडिया अकाऊंटवरून मेसेज आला आणि या आंदोलनाची सुरुवात झाल्याची माहिती समोर आली. पण, विद्यार्थ्यांना कोण भडकवत आहे का? हा प्रश्नही इथे उपस्थित होत आहे. हा विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या आणि जिव्हाळ्याचा विषय असल्याचं वक्तव्य दरेकर यांनी केलं आहे.

Web Title : Police lathicharges students protesting outside education minister’s house

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here